Join us

'बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नाही'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:00 PM

Kiran mane: किरण माने यांना बिग बॉसनंतर खऱ्या अर्थाने ओळखल मिळाली असं म्हणता येईल. मात्र, ज्या शोमुळे त्यांना प्रसिद्ध, यश मिळालं त्या शोच्या आठवणी नको असं ते म्हणत आहेत.

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). समाजात वा कलाविश्वात कोणतीही घटना घडली की किरण माने थेट, निर्भीडपणे त्यांचं मत मांडतात. अनेक सिनेमा, मालिकांमध्ये झळकलेले किरण माने यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या शो नंतर त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. मात्र, आता बिग बॉसमध्ये अडकून पडायचं नाही, असं वक्तव्य करुन ते चर्चेत आले आहेत.

किरण माने यांना बिग बॉसनंतर खऱ्या अर्थाने ओळखल मिळाली असं म्हणता येईल. या कार्यक्रमानंतर त्यांच्या लोकप्रियतेत जबरदस्त वाढ झाली. मात्र, ज्या शोमुळे त्यांना प्रसिद्ध, यश मिळालं त्या शोच्या आठवणी नको असं ते म्हणत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी तशी पोस्टही शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं असून ते असं का म्हणाले हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

"मला बिग बॉसच्या आठवणींत नको इतकं अडकून पडायचं नाही, पण एक मात्र खरं की काळजाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा लै लै लै भारी आठवणी दिल्यात बिग बॉसनं... माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं... ज्यासाठी आयुष्यभर खपलो, ते १०० दिवसांत दिलं... भरभरून... आभाळ भरून मिळतंय अजूनही. संघर्षाचं सोनं होतंय... खूप कामं करतोय... नविन कामांसाठी रोज फोन येताहेत. महाराष्ट्रभर गांवोगांवी बोलावून लोक सत्कार करताहेत ते वेगळंच !! जादू केलीय जादू, त्या नादखुळा शंभर दिवसांनी !!!", अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

दरम्यान, बिग बॉसने आपल्याला प्रचंड प्रेम, मानसन्मान मिळवून दिला हे सांगण्यासाठी त्यांनी या आशयाची पोस्ट लिहिली आहे. सोबतच बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नाही. कारण, त्या आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या आहेत हे त्यांनी आवर्जुन सांगितलं. 

टॅग्स :किरण मानेबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजन