बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करतोय. रितेशबद्दल अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट केलीय. रितेश लिहितो, "रितेश ! हॅटस् ऑफ भावा. ... कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीनं बिगबाॅस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा 'बिगबाॅस' हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही. केवळ 'स्वत:ला आवडतात म्हणून' न खेळणार्या निष्क्रीय लोकांना डोक्यावर घेणे नाही. सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं. आरशासारखं. लख्ख."रितेश पुढे लिहितो, "मुळात तू स्वत: 'माणूस' म्हणून नितळ आहेस. तो नितळपणा तुझ्या सुत्रसंचालनात उतरला आहे. बिगबाॅस हा खेळ सायकाॅलाॅजीकल आहे. विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं 'व्यक्तीमत्त्व' परखण्याचा आहे, याची जाणीव सतत तुला असते, ही तुझी 'युनिक' क्वाॅलिटी आहे.बिगबाॅस हे असं 'रामायण' आहे, ज्यात एकाच माणसात असलेली राम-रावण-सीता-कैकेयी-लक्ष्मण-बिभिषण-भरत-दशरथापास्नं हनुमानापर्यन्त सगळी व्यक्तीमत्त्वं बाहेर पडतात. कधी कुणातली कैकेयी भारी ठरते,तर कधी कुणी बिभिषण ठरतो. माणूसपणाची कसोटी पहाणारा अद्भूत डाव सुरू होतो. यावेळी यांना खेळवणारा, झुलवणारा, चकवणारा, झुंजवणारा आणि फुलवणारा जादूगार फार महत्त्वाचा असतो... रितेश देशमुखच्या रूपानं यावेळी सिझन पाचला असा भन्नाट 'खेळीया' लाभलाय, ज्यानं या सिझनला चार चांद लावलेत !"
किरण माने शेवटी लिहितात, "रितेशभौ, "बिगबाॅस' माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे. मला जीवदान देणारा ऑक्सिजन आहे तो. कुणी निंदा कुणी वंदा, पण माझा जीव आहे या शो वर. तू ज्या पद्धतीनं हा शो होल्ड केलास ते पाहून तुझा खुप अभिमान वाटायला लागलाय. हा सिझन जर नव्या उंचीवर गेला, तर त्यात सिंहाचा वाटा हा तुझ्यातल्या निर्मळ 'माणसा'चा असेल. लब्यू."