Join us

'कधीकधी मुलांची काळजी घेता घेता तू माझी सुद्धा “आई” होतेस..' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 1:19 PM

कुशल स्कीट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. स्कीट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरही तो चाहत्यांना मजेशीर पोस्ट करत मनोरंजक करत असतो. सध्या कुशलची अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कुशलने ही पोस्ट त्याच्या सुन्नैनाच्या बहिणीसाठी लिहिली आहे.

कधीकधी एकाच नात्यात असंख्य नाती दडलेली असतात, बघना कधीकधी मुलांची काळजी घेता घेता तू माझी सुद्धा “आई” होतेस, कधी तुझ्या बहिणी सोबत माझी सुद्धा “बहिण” होतेस, कधी मला, तू माझी “मुलगी” असल्यासारखी तुझी काळजीच वाटू लागते, “नात्याच्या प्रत्येक पदराला वेगळी भावना जोडलेली असते” नाहीका ?  छे आपलं नातं या सगळ्याच्या पल्याड आहे तू “मैत्रीण” आहेस माझी yes a perfect phrase for various relations माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर आणि Brave मैत्रिणे तुला happy birthday. अशी पोस्ट कुशलने केली आहे. स्वप्ना पवार ही कुशलची पती सुन्नैनाची बहीण आहे. 

झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून कुशल प्रकाशझोतात आला. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोद शैलीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. कुशलने मालिकांसोबतच रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकार