Join us

“आपण शाळेत जे शिकलो, ते आयुष्यात...”, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 18:48 IST

"आयुष्यातले कितीही प्रश्न सुटले तरीही दुरावलेल्या माणसांमुळे...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘जत्रा’, ‘डावपेच’, ‘पांडू’ यांसारख्या चित्रपटांत त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो पोस्ट शेअर करत असतो. सध्या कुशलने शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आपण शाळेत जे शिकलो ते पुढे आयुष्यात कामाला येईलच असं नाही. आपल्याला आयुष्यात जोड्या लावता येतात पण “का”? आणि “कसे“? ह्याचे “संदर्भासहित स्पष्टीकरण” मात्र देता येत नाही. आयुष्यातले कितीही प्रश्न सुटले तरीही दुरावलेल्या माणसांमुळे निर्माण झालेल्या “रिकाम्या जागा” भरता येत नाहीत…आणि “सिद्धांतांनी” गणितं सुटतात...माणसं सुटत नाहीत. :- सुकून,” असं कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

Kargil Divas : सिद्धार्थ मल्होत्रा आधी अभिषेक बच्चन दिसलेला विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत, तुम्ही पाहिलाय का चित्रपट?

पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेला मराठी अभिनेता, म्हणाला, “ऑपरेशन झालेली माझी आई...”

दरम्यान, गेली कित्येक वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून कुशल प्रेक्षकांना हसवत आहे. अभिनयाबरोबर विनोदाची उत्तम सांगड घालत तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रावरंभा' चित्रपटात तो ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसला होता. 

 

टॅग्स :कुशल बद्रिकेमराठी अभिनेताचला हवा येऊ द्या