मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या कुशलचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात कुशाल बालपणीचा एक किस्सा शेअर करताना भावूक झाला आहे.
कुशलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं म्हटलंय, 'मी 10 वर्षांचा असताना घरी आई बाबांचं भांडण झालं होत. बाबांना सकाळी लवकर कामाला जाव लागायचं. आईला घरची सगळी काम आटोपून झोपायला उशिर व्हायचा. झोपायला उशिर झाल्यानं बाबांचं जागरण व्हायचं, चिडचिड व्हायची. तेव्हा बाबांनी ठरवलं की घराच्या लागून एक छोटी खोली होती तिथे जाऊन झोपायचं. पण आई बाबांचं वेगवेगळ्या खोलीत झोपणं मला पटत नव्हते म्हणून मी हट्टाला पेटलो आणि माझ्या हट्टापुढे बाबांनी हात टेकले. बाबा पुन्हा आमच्याबरोबर झोपायला लागले. तेव्हा मला फार आनंद झाला.
कुशलनं पुढे सांगितलं, 'काही वर्षांनी कार्यक्रमांच्या निमित्तानं पंढरपूरला जाणं झालं आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो. तेव्हा मला कळलं की, विठ्ठल आणि रखुमाई एकत्र राहत नाही. मंदिर एकच आहे पण गाभारे वेगवेगळे आहेत. ते पाहिल्यावर मला लहानपणीची आठवण आली. त्यानंतर विठ्ठल आणि रखुमाई वेगवेगळे आहेत ही गोष्ट माझ्या मनात घोंघावत राहिली'.
लहानपणीची आठवण सांगत असताना कुशलनं स्वत: केलेली विठू दिसे ठायीठायी दाही दिशेला विठायी ही कविता देखील सादर केली. 'खुप कमाल, कुशल तुला एकदम भारी सुचत', असं म्हटलं आहे. अशी कमेंट कुशलच्या या व्हिडीओवर त्याची सहकलाकार श्रेया बुगडेनं केली आहे. खूप छान, अप्रतिम, खूप सुंदर अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.