मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. बऱ्याचदा पोस्टमधून पत्नीविषयीचं प्रेम व्यक्त करणाऱ्या कुशलने यावेळी त्याच्या लेकासाठी पोस्ट शेअर केली आहे.
कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो कायम काही ना काही नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. यात पावसाळा सुरु झाल्यापासून त्याने पावसाशी संबंधित अनेक पोस्ट केल्या आहेत. यावेळी त्याने पाऊस आणि त्याचा लेक यांच्याविषयी पोस्ट लिहिली आहे. सोबतच एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
कुशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा शाळेतून घरी येत आहे. विशेष म्हणजे त्याचा लहानगा मुलगा भरपावसात मस्तपैकी भिजत आहे. या बालवयात तो ज्याप्रकारे पावसाचा आनंद घेतोय ते पाहून कुशलला त्याचं बालपण आठवलं आहे. त्यामुळे पाऊस आवडणं हे आमच्या रक्तात असल्याचं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, 'आभाळात ढगांमधून वाहत जाणारा पाऊस आवडणं, हे बहुतेक आमच्या रक्तामधून वहात आलंय,' असं कॅप्शन कुशलने या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.