Join us

'तीन वर्षात डोक्याचा जो..'; मिलिंद गवळींची जावयासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 4:18 PM

Milind gawali: जावयाच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घऱाघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारुन तो चर्चेत आला. मात्र, ग्रे शेड असलेली ही भूमिका साकारल्यामुळे अनेकदा त्याला टीकेचंही धनी व्हावं लागलं. मिलिंद गवळी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम चाहत्यांसोबत त्यांच्या जीवनातील अपडेट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या जावयाविषयी एक पोस्ट लिहिली आहे.

जावई बापू जय हो “ जावई हे असे व्यक्तिमत्व असतं, ज्याला मुलीच्या माहेरी सगळ्यात मोठ आणि सगळ्यात महत्त्वाचे स्थान असतं. मी माझ्या लहानपणापासून जावयाला किती महत्त्व असते हे आमच्या घरामध्ये बघत आलो आहे, माझ्या आजी आजोबांना पाच जावई होते, especially माझ्या आजीसाठी ते किती महत्त्वाचे होते ते मी पहात आलो होतो, त्यात माझ्या वडिलांसारखा अगदी समंजस, प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष असा जावई त्यांना मिळाला होता, म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, सगळ्यांना त्यांचं कौतुक करता करता आजीची जीभ थकायची नाही,माझ्या आजी आजोबांसारखा त्याबाबतीत मी खूप नशीबवान आहे. मला दिग्विजय ( ज्याला मी प्रेमाने दिगू बाबा म्हणतो), जो जावई म्हणून आला आणि माझा मुलगाच झाला , तसंच तो माझा मित्र पण झाला, त्याचबरोबर तो माझा philosopher, and guide पण झाला, असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "त्याला सिनेमाची अतोनात आवड असल्यामुळे आणि Encyclopedia सारखी सिनेमा क्षेत्राची माहिती व अभ्यास असल्यामुळे, ही मैत्री अजूनच घट्ट झाली आहे, सिनेमाबद्दलच्या त्याच्या ज्ञानाने मी सतत अवाक होत असतो, गेल्या पाच वर्षात त्यांनेच सांगितलेले सिनेमे मी बघितले आहेत.दिसायला राजबिंडा तो आहेचं, त्याचबरोबर physical fitness आणि mental health ला प्रथम प्राधान्य देणारा , स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा, गेली तीन वर्ष अनिरुद्ध देशमुख ने माझ्या डोक्याचा जो भोगा केला आहे, पण दिगू बाबानेच मला बऱ्यापैकी माणसात ठेवण्याचा प्रयत्न केला , म्हणजे तो माझ्या जावयाबरोबर मुलगा आणि कौन्सिलर माझा Counselor पण झालाय. आज दिगू बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला भरभरून आशीर्वाद , खूप खूप शुभेच्छा, खूप खूप प्रेम, यशस्वी हो, असाच नेहमी मस्त , आनंदी आणि बिनधास्त रहा. मी भाग्यवान आहे नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस". 

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनसेलिब्रिटी