Join us

'आई कुठे काय करते' च्या अनिरुद्धने केलाय ग्रेसी सिंगसोबत सिनेमा, पोस्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 1:39 PM

ग्रेसी सिंगसोबत केला सिनेमा, पण रिलीजच झाला नाही? वर्णभेदावर होता आधारित

'आई कुठे काय करते' मालिकेतून मिलिंद गवळी (Milind Gawali) अनिरुद्ध या भूमिकेमुळे चांगलेच लोकप्रिय झाले. त्यांच्या चाहतावर्गात कमालीची वाढ झाली. मिलिंद गवळींनी उत्तम कलाकार असल्याचं सिद्ध केलं. मालिकेत त्यांची काहीशी निगेटिव्ह भूमिका आहे. सोशल मीडियावरही मिलिंद गवळी खूप अॅक्टिव्ह असतात. सिनेइंडस्ट्रीतले त्यांचे अनेक किस्से ते शेअर करत असतात. मिलिंद गवळींनी त्यांच्या न रिलीज झालेल्या एका हिंदी सिनेमाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मिलिंद गवळींनी एका हिंदी सिनेमात काम केले होते. यामध्ये 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगान' फेम अभिनेत्री ग्रेसी सिंगही मुख्य भूमिकेत होती. मिलिंद गवळी आणि ग्रेसी सिंह यांची जोडी होती. वर्णभेदावर हा सिनेमा आधारित होता. मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर करत सिनेमाबद्दल लिहिले. 

'रंग माझा वेगळा', 'हम काले है तो क्या हुआ दिलवाले है', 'हम तेरे तेरे चाहने वाले है', 'गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण'. लहानपणापासून गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा आजूबाजूच्या लोकांनी करून दिली होती. किती छान गोरा आहे वा किती सुंदर गोरी आहे हेच सतत कानावर पडत आलं होतं. फेअर अँड लव्हलीचा खप उगाच नाही वाढला आपल्या देशात. हळूहळू जसजसा मी मोठा होत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं, माझी आई तिच्या सगळ्या बहिणींपेक्षा सावळी होती पण ती त्या सगळ्यांपेक्षा खूपच सुंदर होती!माझा खरा रंग कोणता आहे मला पूर्वी शाळा कॉलेजात कधी कळलं नाही, आपल्या चेहऱ्याचा रंग काळा असावा असंच मला वाटत होतं. सतत गोट्या ,भवरे, पतंग, क्रिकेट, सायकल चालवणे, उन्हात भटकणे हाच कार्यक्रम असायचा त्यामुळे, सतत उन्हात रापलेला चेहरा, काळा कुट्ट असायचा, त्यामुळे आई शिवाय दुसरं कोणीही मला ‘तू छान आहेस‘ ‘सुंदर आहेस‘ ‘गोड दिसतोस‘ वगैरे असं कधी कुणी म्हटलं नाही, कदाचित माझ्या आईला माझ्या चेहऱ्यापलीकडचा आतला मनातला रंग दिसत असावा.

मग मोटरसायकल चालवणं सुटलं आणि हळूहळू माझ्या चेहऱ्याचा रंग उजळत गेला. मग मला कळलं की मी सावळ्या रंगाचा आहे आणि हाच रंग आपल्या संपूर्ण भारतीयांचा पण आहे. अमेरिकेत युरोपमध्ये गोरे आफ्रिकेमध्ये काळे आणि एशियामध्ये सावळे गव्हाळ रंगाचे माणसं असतात. मग मला कळलं की “beauty lies in the eyes of the beholder “ आणि खरंच रंगावर काहीच नसतंदुबईच्या सिटी मॉलमध्ये उभा असताना मला जगातल्या विविध रंगांच्या लोकांचं दर्शन झालं pink eskimos पाहिली. दुधापेक्षा पांढरीशुभ्र माणसं पाहिली, कोळशापेक्षा काळी कुट्ट माणसे पाहिलेत. जगातल्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या माणसांची वेगळे वेगळे रंग आणि सगळ्यांमध्ये आपापले एक वेगळंच सौंदर्य, कदाचित त्या दिवसापासून मी माझ्या skin मध्ये comfortable आलो. त्या दिवसापासून मी आहे तसा स्वतःला Accept करायला लागलो.

Grass is always greener on the other side , जे सावळे असतात त्यांना गोरं व्हायचं असतं, आणि गोरे लोक tan होण्यासाठी आमच्या गोव्यामध्ये येऊन sunbathing करतात. I think we should accept the way we are, As long as our Skin is healthy and glowing, it does not matter what the colour of your skin is . निरोगी शरीर आणि त्वचा हे सौंदर्याचं रहस्य आहे. ह्या चंचल सिनेमामध्ये काळ्या गोऱ्या रंगाचाविषय मांडला होता. दुर्दैवाने तो लोकांसमोर आलाच नाही. ही माझी फिल्म रिलीज झालीच नाही."

टॅग्स :मिलिंद गवळीमराठी अभिनेताग्रेसी सिंगबॉलिवूडसिनेमा