Join us

"गल्लीत त्रास देणाऱ्या मुलाला मी राणीच्या बागेत सोडून आलो आणि...", मिलिंद गवळींनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:05 IST

"हे वेगळंच विश्व...", मिलींद गवळींनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दिली भेट; जंगल सफारीचा लुटला आनंद

Milind Gawali : मिलींद गवळी (Milind Gawali) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ते ओळखले जातात. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करुन त्यांनी सिनेसृष्टीत स्वत: चा एक वेगळाच ठसा उमटवला. मिलींद गवळींनी आपल्या अभिनय कारकिर्दीत एकापेक्षा एक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच आई कुठे काय करते मालिकेमुळे ते आणखी चर्चेत आले. मिलींद गवळी हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते यामार्फत चाहत्यांना देत असतात. नुकतीच त्यांनी मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कची सफर केली आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मुंबईचे फुप्फुस म्हणून ओ‌ळखल्या जाणाऱ्या  बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मिलींद गवळी यांनी सपत्नीक भेट दिली. याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  शिवाय या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी त्यांचा अनुभवही लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, "खरंच मुंबई किती सुंदर आहे, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मुंबईकर आहे, माझे आई-वडील नाशिकचे, वडिलांची नाशिक पोलीस ट्रेनिंग नंतर पहिली पोस्टिंग मुंबईत झाल्यामुळे, मी मुंबईकर झालो, लहानपणापासून भटकायची सवय असल्यामुळे, मुंबईत मी भटक भटक भटकलोय, मुंबई हे वेगळच विश्व आहे, आणि अनेक जणांनी वर्षानुवर्ष मुंबईत राहून सुद्धा खरी मुंबई पाहिलेलीच नाहीये, शाळेत असताना सायकल होती, डिलाईल रोड ला मी राहायचो, त्यामुळे दादर ते भायखळा हा भाग सायकलवरून खूप भटकलो, गल्लीत सगळ्यांना त्रास देणाऱ्या एका मुलाला मी राणीच्या बागेत सोडून आलो होतो, मग कॉलेजमध्ये मोटरसायकल मिळाली आणि विरार ते कफपरेड सगळा भाग पिंजून काढला."

यानंतर पुढे त्यांनी लिहिलंय, "क्रॉफर्ड मार्केट, चोर बाजार, गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुफा, बोरिवली नॅशनल पार्क, एस्सेल वर्ल्ड, मड आयलँड, पाली हिल, नरिमन पॉईंट, मलबार हिल, मरीन ड्राईव्ह, डोक्यार्ड, भाऊचा धक्का, मोहम्मद अली रोड, वडाळा फाईव गार्डन, पारसी कॉलनी, ग्रँड रोड मिनरवा नोवेलटी सिनेमा, बादल बिजली बरका माटुंगा, गेटी गॅलेक्सी बांद्रा, खोताची वाडी गिरगाव, मुंबादेवी, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर, माहीम चर्च माउंट मेरी बांद्रा चर्च, माहीमचा दर्गा, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, धोबी तलाव, धारावी , खरंतर पाश्चात्य देशातले लोक मुंबईला येतात तर धारावीची सिटी टूर करतात, फक्त धारावी दाखवण्यासाठी स्पेशल टूर गाईड आहेत. मुंबईतलं धारावी एक वेगळं विश्व आहे ज्याची कोणाला कल्पना सुद्धा करता येणार नाही, तसंच शिवाजी पार्क एक वेगळे विश्व आहे."

नॅशनल पार्कची केली सफर

"काही महिन्यापासून माझी लेक मिथिला माझ्या आणि दिपाच्या मागे लागली होती छान जंगल सफारी करून या, Tipai Wildlife छान आहे तिथे जाऊया, मी बुकिंग करते, पंतप्रधानांनी वनताराच उद्घाटन केलं तिथे जा ( not open for public yet), ताडोबा, किंवा जिम कॉर्बेट (₹75000/-), नाहीतर तुम्ही सरळ केनीयाला जा (3n/4d ₹4,30,000), मसईमारा (5n/6d ₹3,21000), सैरिंगटी. मी म्हटलं खूप ऊन असेल, मुंबई ठाणे इतकं उष्ण आहे  तर यवतमाळ नागपूर आफ्रिका किती गरम असेल, त्या ओपन जीप मधून खडक उन्हात वाघ बघायला जायचं, मी म्हटलं तूझ्या आईला एवढं ऊन सहन होणार नाही, तिला वाघ दाखवायचा आहे ना, promise उद्या सकाळी तिला छान वाघ दाखवून आणतो, ते पण एसी गाडीमध्ये बसून. आज आम्हाला अंधेरीवरून ठाण्याला जायचं होतं, on the way दिपाला चार Royal Bengal Tigers, आणि दोन सुंदर वाघाचे बछडे, आणि खूप हरणं तिला दाखवले आणि दोन तासात घरी पण पोचलो.दोघांचा Total खर्च झाला ₹६७८/-रुपये म्हणजे $७.९/-डॉलर्स...". असं म्हणत त्यांनी नॅशनल पार्कला भेट दिल्याचा अनुभव शेअर केला आहे. 

टॅग्स :मिलिंद गवळीमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया