स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली. तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या मालिकेतही प्राजक्तानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. याच प्राजक्ताचा एक व्हिडीओ पाहून चाहते भारावले आहेत. होय, तुझा साधेपणा आणि सच्चेपणा पाहून खरंच छान वाटतं, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. आता प्राजक्ताने असा काय खास व्हिडीओ शेअर केलाय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर व्हिडीओत प्राजक्ता नव्या कोऱ्या सायकलची पूजा करताना दिसतेय.
अनेक कलाकार आपल्या चारचाकीची पूजा करतानाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. पण प्राजक्ताने मात्र सायकल विकत घेतलीय. नवी सायकल घरी आल्याचा आनंद प्राजक्ताच्या कृतीतून झळकतो आहे. तिने सायकलला हारफुलं वाहिली. सायकलची खास पूजा केली. प्राजक्ताच्या या व्हिडिओचं सगळीकडे कौतुक होतंय. "अभिनंदन... पेढे द्या... छोटी असो वा मोठी सायकल काय गाडी काय एकच", "ताई तुमची simplicity पाहून खूप छान वाटत", अशा कमेंट या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी नाटकात अभिनय करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभरात दौरे सुरु आहेत. प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत शिवपुत्र संभाजी नाटकात काम करतेय. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले.