Join us

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्याने सुरु केला व्यवसाय, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 11:56 AM

अभिनय सांभाळत आता व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण, सध्या लोकप्रिय मालिकेत साकारतोय खलनायक

गणरायाचं सगळीकडे थाटात आगमन झालं आहे. या शुभ मुहुर्तावर एका मराठी अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो ज्या कामात व्यस्त होता ते आता समोर आलं आहे. अभिनेत्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला असून व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. कोण आहे तो अभिनेता?

सध्या गाजत असलेल्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत खलनायकाचं पात्र साकारणारा हा अभिनेता आहे प्रसाद लिमये (Prasad Limaye). गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर त्याने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याने स्वत:चं 'अन्नपूर्णा' हे क्लाउड किचन सुरु केलं आहे. 'जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही!! आणि तोच आनंद द्विगुणीत करायला आम्ही घेऊन येत आहोत खास ठाणेकरांसाठी “अन्नपुर्णा” ची मेजवानी!!' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. त्याचं ही सेवा ठाण्यात सुरु झाली आहे.

प्रसाद लिमयेने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या तो 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत किशोर जहागिरदार हे खलनायकाचं पात्र साकारत आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून तो घराघरात पोहोचला. प्रसादने 'मोगरा फुलला','व्हॉट्सअॅप लग्न','दगडी चाळ','फत्तेशिकस्त' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताव्यवसायटेलिव्हिजन