Join us

'आपण फिट तर आयुष्य हिट'; हार्दिक जोशीने सांगितला फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:06 IST

Hardik joshi : सध्या हार्दिक तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे शुटिंगच्या वेळांमुळे त्याला वर्कआऊटसाठी वेगळा वेळ काढता येत नाही. त्यामुळे त्याने एक शक्कल लढवली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि राणादा या नावाने विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटीमुळे हार्दिकने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. आजही त्या मालिकेतील साधा भोळा पण तितकाच रांगडा राणादा प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. इतकंच नाही तर त्याच्यासारखं फिट राहावं यासाठी काही तरुण प्रयत्नही करतात. म्हणूनच, हार्दिकने त्याचा फिटनेस फंडा शेअर केला आहे.

सध्या हार्दिक तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्या शुटिंगच्या वेळांमुळे त्याला वर्कआऊटसाठी वेगळा वेळ काढता येत नाही. मात्र, स्वतंत्र वेळ मिळत नसला तरीदेखील हार्दिक जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याचं वर्कआऊट करतो. 

राणादाने शेअर केला फॅमिली फोटो; आई-वडिलांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

"खरं तर आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं झालं आहे आणि मुळात मी फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे दैनंदिन मालिका करताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो हे खरं आहे. म्हणून जरी मी मालिका करत असलो तरी मी जसा वेळ मिळेल तसं जिमला जातो. शिफ्टच्या आधी किंवा नंतर दीड ते दोन तास वर्कआउट करतो. जर अगदीच वेळ ऍडजस्ट होत नसेल तर सीनच्या मध्ये जर फावला वेळ असेल त्यावेळी आराम न करता जीमला जातो, असं हार्दिक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, जीम झालं की परत येऊन शूटिंग करतो. माझ्यासाठी फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी अभिनय क्षेत्रात आहे म्हणून नाही. तर, वयक्तिक आयुष्यात देखील फिटनेस खूप महत्वाचा आहे सर्वांसाठीच. कारण जर आपण फिट असू तर आयुष्य हिट आहे असं मी नेहमी म्हणतो." 

टॅग्स :हार्दिक जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजन