Join us  

लोकप्रिय अभिनेता रमला शेतमळ्यात, भात लागवडीचे Photo शेअर करत म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 3:45 PM

मराठी मालिकेतला अभिनेता कोकणातल्या गावी शेतमळ्यात काम करतोय.

 मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शहरांपासून दूर शांतता असलेल्या ठिकाणी आपला आशियाना वसवला आहे.  तिथे राहून हे कलाकार शेती करतायत. भरत जाधव कोल्हापूरात तर  मृण्मयी देशपांडेने महाबळेश्वरमध्ये राहत आहेत. या कलाकारांमध्ये आता आणखी एका अभिनत्याचा समावेश झाला आहे. हा अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. गावाकडे शेती करण्यात ऋतुराज रमल्याचं दिसून आलं आहे. त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

ऋतुराज शेतीसाठी वेळ काढून त्याच्या गावी पोहचला. ऋतुराज मूळचा दापोलीमधील चिंचाळी गावचा आहे.  लॉकडाऊनपासून त्यानं आपल्या शेतमळ्यात काम करण्यास सुरुवात केली आहे.  ऋतुराज आपल्या मळ्यात तो सध्या भात पिकवत आहे. नुकतंच ऋतुराजचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात तो भात लागवड करताना दिसून येत आहे.  शेतात काम करणे त्याला खूप आवडते असल्याचं त्यानं म्हटलं. शेतातले फोटो शेअर करत त्यानं लिहलं, 'कोकणात भात शेतीला सुरूवात. शेती इकायची नसते, शेती राखायची असते'. 

 ऋतुराजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'मन उडू उडू झालं' या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता. ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं. तर लवकरच ऋतुराज हा प्रसाद ओकची मुख्य भूमिका असेलल्या लोकप्रिय सिनेमा 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाच्या पुढच्या भागात दिसणार आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीकोकणशेती