Join us

संकर्षणने मुलांमुळे पुन्हा अनुभवलं बालपण; शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:23 IST

Sankarshan karhade: संकर्षणने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच त्याच्या बालपणीचा काळ कसा होता हे त्याने सांगितलं आहे.

मराठी कलाविश्वातील ऑलराऊंडर अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). उत्तम अभिनेता, सूत्रसंचालक, निवेदक, कवी अशा वेगवेगळ्या  संकर्षण उत्तमरित्या पार पाडत आहे. संकर्षण सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो त्याच्या मुलांविषयी पोस्ट शेअर करत असतो. यावेळीही त्याने त्याच्या जुळ्या बाळांसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र, या पोस्टच्या माध्यमातून त्याने  त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रविवार, बाबांशी गप्पा मारत सुरू झाला. मी ह्यांच्या इतका लहान होतो तेंव्हा रविवार फार वेगळा होता…. मस्तं होता..आख्खा आठवडा अंगावर घेतलेली धूळ आई किंवा आजी “लिरील” साबणाने घासून घासून काढायची…. ते डोळ्यात गेलं कि बोंबाबोंब मग रंगोली पाहात पाहात चहाच्या कपात दूध, बोर्नव्हीटा आणि बिस्किटांचा लगदा करून खायचा… मग “जंगल जंगल बात चलीं है पता चला है” मोगली.. दुपारी छायागीत. जेवण झाल्यावर दुपारी रात्रीपेक्षाही गाढ झोपायचं. मग ४ वा. सह्याद्रीवर मराठी सिनेमा (बनवा बनवी )आणि संध्याकाळनंतरचा सग्गळा वेळ उद्या शाळा आहे ह्या दुःखात, असं कॅप्शन देत संकर्षणने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान,  संकर्षणची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्या बालपणीच्या काळात आठवला. त्यामुळे त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. संकर्षणला दोन जुळी मुलं आहेत. यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासिनेमा