Join us  

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बहीण मालिकेत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणतो- चित्रपटसृष्टीत मी १२ वर्ष...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 5:53 PM

मराठी अभिनेत्याच्या बहिणीचं मालिकेतून अभिनयात पदार्पण, शेअर केली खास पोस्ट

अनेक मराठी मालिका आणि सिनेमांत काम करून सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संकेतने अभिनयाच्या जोरावर त्याचं स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच संकेत त्याच्या रील्समुळेही चर्चेत असतो. बहिणीबरोबरचे त्याचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. संकेत बहीण उमाबरोबर वेगवेगळ्या विषयावर मजेशीर रील बनवत असतो. ही भावा-बहिणीची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. 

रीलमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या संकेतची बहीण उमानेही आता अभिनयात पदार्पण केलं आहे. उमाने छोट्या पडद्यावरुन अभिनयात पाऊल ठेवलं आहे. स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या मालिकेत उमा छोट्याशा भूमिकेत दिसली. लाडक्या बहिणीसाठी संकेतने खास पोस्ट शेअर केली आहे. 

उमा तू पहिल्यांदा TV वर दिसलीस आणि नेमकं मी तिथे तुला बघायला नाही आहे पण आनंद ह्याच गोष्टीचा आहे की तुझ्या स्वप्नांना उशिरा का होईना पण सुरुवात झाली. स्वतःच्या जीवावर माझीही मदत न घेता ही लहानशी भूमिका मिळवलीस. तुझा उत्तम अभिनय लवकरच योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि तुला अजुन छान भूमिका मिळेल ज्यातून तुला तुझं खरं पोटॅनशियल लोकांना दाखवता येईल. 

 

आज चित्रपटसृष्टीत माझं १२ वं वर्ष सुरु आहे ह्या हक्काने तुला सांगेन की उतू नको मातू नको हातातलं काम अर्ध्यात सोडू नको. खूप शुभेच्छा... माझी मैत्रीण @manasisuresh_ ला खूप प्रेम कारण १० दिवस तिने उमाची खूप काळजी घेतली त्यात माझा मित्र आकाश नलावडेचे देखील कौतुक की सेट वर त्याने उमाची पुरेपूर काळजी घेतली. 

उमेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी उमाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, संकेतने 'अजूनही बरसात आहे', 'हम बने तुम बने' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. 'टकाटक' या सिनेमातही तो झळकला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता