Join us

सर सलामत तो पगडी पचास! फोटोतील मराठी अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:51 IST

एक मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. वेगवेगळ्या लूकमधील कलाकारांचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अभिनेत्याने पंजाबी लूक केल्याचं दिसत आहे. त्याने डोक्यावर पगडी बांधली आहे. दाढी वाढवलेली असल्याने हे फोटो पाहून तो अभिनेता नक्की कोण आहे, हे सांगणं कठीण आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून मराठमोळा सुयश टिळक आहे. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पंजाबी लूकमधील काही फोटो शेअर केले आहे. एका मालिकेसाठी त्याने हा लूक केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय असेलल्या 'अबोली' मालिकेत सुयश टिळकची एन्ट्री झाली होती. या मालिकेत तो सचित राजे ही भूमिका साकारत आहे. अनेकदा सचित वेष बदलत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सुयशचा हा अकरावा लूक आहे. याआधी नर्स, पोस्टमन, वयोवृद्ध आजोबांच्या लूकमध्ये सुयश मालिकेत दिसला. 

'का रे दुरावा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुयश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'शुभमंगल ऑनलाइन', 'एक घर मंतरलेलं', 'दुर्वा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये सुयश महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. त्याने चित्रपटांतही काम केलं आहे. 

टॅग्स :सुयश टिळकटिव्ही कलाकार