Join us  

वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:38 PM

वैभव चव्हाणचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला असून रितेश देशमुखने तो evict झाल्याचं जाहीर केलं

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात मोठा ड्रामा रंगताना दिसला. टास्कदरम्यान निक्कीला कानाखाली वाजवल्याने काल आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं. तर आज बिग बॉसमधून वैभव चव्हाणचा खेळ संपला. वैभव चव्हाणला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलंय. नॉमिनेटेड सदस्यांपैकी वैभवला कमी मतं मिळाल्याने ५० व्या दिवशी वैभवचा खेळ संपला आहे.

वैभव चव्हाण बिग बॉसमधून बाहेर

या आठवड्यात वैभवसोबतच आणखी पाच सदस्य नॉमिनेट होते. वैभव चव्हाण, आर्या जाधव, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत हे सहा सदस्य नॉमिनेट होते. यापैकी वैभव चव्हाणला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं आहे. वैभवच्या नावाची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला. घरातील वैभवचा खास मित्र अरबाज पटेलला अश्रू अनावर झाले. याशिवाय त्याची खास मैत्रीण जान्हवीलाही रडू कोसळलं. सर्वच सदस्य भावुक झालेले दिसले.

वैभव चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास

वैभव चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास काहीसा वादग्रस्तच राहीला. वैभवने अरबाज पटेलसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली. पुढे वैभवची अरबाज, जान्हवी, निक्कीसोबत चांगली मैत्री झाली. या चौघांचा A ग्रुप तयार झाला. तर दुसरीकडे वैभवची घरात वर्षा उसगांवकरांसोबत मोठं भांडण झालं होतं. वैभवने मोठ्या आवाजात वर्षा उसगांवकरांशी वाद घातला होता. याशिवाय आर्या आणि वैभवचेही खटके उडालेले दिसले. वैभव आणि इरिना यांचं नातं मैत्रीपलीकडे गेलेलं आपण पाहिलं. अनेकदा रितेभ देशमुखने भाऊच्या धक्क्यावर अरबाज २ म्हणून वैभवला नाव ठेवलं. पण वैभव घरात असेपर्यंत मैत्रीखातर तो अरबाजच्या विरोधात गेलेला दिसला नाही. अखेर आज ५० दिवसांनी वैभवचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीटेलिव्हिजनरितेश देशमुख