Join us

कुलकर्णींच्या सूनबाईंनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विराजससाठी लिहिली पोस्ट, म्हणाली-या वेड्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:37 IST

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी गेल्या वर्षी ३ मे रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांची कॉलेजमध्ये असताना एका नाटकात काम करताना ओळख झाली होती. आज दोघे आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतायेत.

शिवानी रांगोळे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. शिवानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने दोघांचे काही खास फोटो शेअर केलेत. यातील पहिला फोटो हा त्यांच्या लग्नादरम्यानचा आहे. तर इतर दोन फोटो दोघे समुद्र किनाऱ्याची मज्जा लुटताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना शिवानीने कॅप्शनमध्ये लिहिले, या वेड्या जोडप्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”. 

शिवानी व विराजस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. डावीकडून चौथी बिल्डिंग या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली होती. या नाटकाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली. 

विराजसनं होस्टेल डेज या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. अनाथेमा या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.  शिवानीबद्दल सांगायचं तर सध्या तिची झी मराठी तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका सुरु आहे. बनमस्का  मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 

टॅग्स :शिवानी रांगोळेविराजस कुलकर्णी