Join us

'तू मला सोडून गेलास, पण..; अम्माने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 2:03 PM

Aasha Dnyate:आशा ज्ञाते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून कायम चाहत्यांसोबत भन्नाट रिल्स शेअर करत असतात.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांमध्ये चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्येच मालिकेतील अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून कायम चाहत्यांसोबत भन्नाट रिल्स शेअर करत असतात.

आशा ज्ञाते (Aasha Dnyate) यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये त्या एक मजेशीर डायलॉग म्हणताना दिसून येत आहेत. "तू मला सोडून गेलास, तर पडला नाही मला फरक. मागून आलाय दुसरा तू जरा बाजूला सरक", असं या व्हिडीओमध्ये आशा ज्ञाते बोलताना दिसून येतात. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली लावताना दिसून येतात. त्यामुळे एक स्त्री तिच्या आयुष्यात सहज पुढे जाऊ शकते असा संदेशही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.

दरम्यान, आशा ज्ञाते या सोशल मीडियावर कायम नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियाप्रमाणेच त्यांचा कलाविश्वातही दांडगा वावर आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील त्यांची आम्मा ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरताना दिसते. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन