Join us

Abhidnya Bhave : ती सवत होण्याआधी मी तिला..., अभिज्ञा भावेनं सांगितला ‘जॅकलिन’चा ‘तो’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 2:07 PM

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावे ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री. सध्या ती झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसतेय. पण सध्या अभिज्ञाच्या या भूमिकेची नाही तर वेगळीच चर्चा आहे...

अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री.  सध्या ती झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसतेय. पण सध्या अभिज्ञाच्या या भूमिकेची नाही तर वेगळीच चर्चा आहे. होय, चर्चा आहे ती अभिज्ञाच्या एका बॉलिवूड मैत्रिणीची. होय, ती सवत होण्याआधी अभिज्ञाने तिला मैत्रिण बनवून टाकलं. होय, खुद्द अभिज्ञाने हा खुलासा केला आहे.अभिज्ञा व तिचा पती मेहुल पै हे दोघं अलीकडे ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात सहभागी झालेत. याचा एक मजेशीर व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर  शेअर केला आहे. या व्हिडीओत शोचा होस्ट निलेश साबळे मेहुलला अभिज्ञाची आवडती मैत्रिण कोण? असा प्रश्न करतो. यावर मेहुल अनुजा साठे असं उत्तर देतो आणि ते उत्तर चुकलेले असतं. या प्रश्नाचं उत्तर जॅकलिन फर्नांडिस असं असतं.

आश्चर्य वाटले ना? जॅकलिन फर्नांडिस अभिज्ञाची आवडती मैत्रिण कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागे अभिज्ञाचं एक मोठ्ठ लॉजिक आहे. होय, खुद्द अभिज्ञानेच याचा खुलासा केला.ती म्हणाली, ‘मी लग्नानंतर मेहुलला विचारलं होतं की बायको म्हणून मला कोणत्या व्यक्तीकडून धोका असेल? त्यावर त्याने मला जॅकलिन फर्नांडिस म्हटलं होतं. त्यामुळे मी तिला मैत्रीण बनवली, मग ती आता माझी सवत होणार नाही.’ अभिज्ञाचं हे उत्तर ऐकून सगळे हसत सुटतात. मेहुलचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो.

अभिज्ञा आणि मेहुल यांनी गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली.  लग्नानंतर वर्षभरातच मेहुलला कर्करोगाचं निदान झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता मेहुल या आजारातून बरा झाला आहे. कॅन्सरविरूद्धची लढाई त्याने जिंकली आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावेचला हवा येऊ द्या