Join us

पहिल्याच भेटीत मेहुलने केला होता अभिज्ञाचा अपमान; कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर काढलं होतं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 17:08 IST

Abhidnya bhave: अभिज्ञाचा अपमान झाल्यामुळे ती रागारागात स्टुडंट काऊसिलतच्या रुममधून बाहेर पडली होती.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (abhidnya bhave). अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिज्ञा सध्या हिंदी मालिका विश्वात तिचं स्थान निर्माण करत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ती कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. अभिज्ञाने मेहुल पै याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अलिकडेच या जोडीने लोकमत फिल्मीच्या 'Love game लोचा' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये या जोडीने त्यांच्या भेटीचा पहिला किस्सा सांगितला.

अभिज्ञा आणि मेहुल ही जोडी नेटकऱ्यांमध्ये कामय चर्चेत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात. मेहुल आणि अभिज्ञा हे एकाच कॉलेजमध्ये शिकले असून कॉलेजमध्येच त्यांची पहिली भेट झाली होती. मात्र, पहिल्याच भेटीत मेहुल अभिज्ञावर वैतागला होता. इतकंच नाही तर त्याने स्टुडंट काऊंसिलच्या रुममधून तिला आणि तिच्या मैत्रिणींना बाहेर सुद्घा हकललं होतं.

"आम्ही पहिल्यांदा जेव्हा कॉलेजमध्ये भटलो होतो त्यावेळी ही नुकतंच तिचं लेक्चर संपवून ती तिच्या मैत्रिणींबरोबर स्टुडंट काऊंसिलच्या रुममध्ये आली होती. त्यावेळी कॉलेजमध्ये एक रूम होती जिथे हिच्या मैत्रिणी आणि ही बॅग ठेऊन कॉलेजमध्ये फिरायच्या. त्यावेळी सुद्धा त्या बॅग ठेवायला आल्या होत्या. आणि, मी प्रिन्सिपलला भेटून पुढच्या इव्हेंटच्या कामासाठी, कॉलेज डे, फेस्टिव्हल कसं प्लॅनिंग करायचं ते ठरवत होतो. त्यावेळी आमची पहिली भेट झाली. मी एवढं काम करुन येतोय आणि तुम्ही चक्क बॅगा ठेऊन बाहेर फिरायला जाताय. ते पाहून मी यांना सांगितलं की त्या बॅगा उचला आणि जा", असं मेहुलने सांगितलं. त्याचं हे वाक्य मध्येच तोडत अभिज्ञाने तिचं मत मांडलं. 

"याने इतक्या साध्या शब्दांत आम्हाला सांगितलं नव्हतं. तर, चक्क हकलून दिलं होतं. जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर बाहेर जाऊन करा असं तो म्हणाला म्हणाला. त्याचं हे ऐकून माझं असं झालं होतं की, हा कोण आहे. एवढा माज आहे याला. तसं पाहायला गेलं तर हा माझा सिनिअर होता त्यामुळे तसा आमचा काही थेट संबंध नव्हता. पण माझा खूप अपमान झाल्यामुळे मी तिकडून निघाले", असं सांगत अभिज्ञाने तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

टॅग्स :अभिज्ञा भावेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार