लोकप्रिय मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली' मधील अभिनेत्री आदिती द्रविड (Aditi Dravid) घराघरात पोहोचली. आदिती सोशल मीडियावर सक्रिय असते शिवाय ती चालू घडामोडींवर भाष्य करत असते. आता तिने आयपीएल बाबतीत एक सडेतोड विधान केलं आहे. 'आयपीएल म्हणजे मिक्स भेळ त्यात काही भावनाच नाही ' असं ती नुकतीच एका युट्यूब पॉडकास्टमध्ये बोलली.
सध्या आयपीएलचा(IPL) चा हंगाम सुरु आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. प्रत्येक जण आपापल्या टीमला पाठिंबा देतोय. मात्र ही एक मिक्स भेळ झाली आहे असं मत मराठी अभिनेत्री आदिती द्रविडने व्यक्त केलंय. आदिती म्हणाली,'' अनेकांना अनेक खेळाडूंची नावच माहीत नाही. मलाही माहित नाही. हा आता मी फॉलो करत नाही हेही खरं आहे. मात्र ती एक मिक्स भेळ झाली आहे. आपण नक्की कोणाला पाठिंबा देतोय, खेळाला की खेळाडूंना की राज्यांना. नक्की काय चालू आहे?'
ती पुढे म्हणाली, 'क्रिकेट हा खेळ म्हणजे माझ्यासाठी देशभक्तीचा मुद्दा आहे. मात्र अचानक IPL सुरू झाल्यानंतर या माझ्या भावनाच नाही आहेत असं जाणवलं. ही कोण माणसं आहे असं वाटायचं. सचिन आणि रिकी पाँटिंगला एकाच टीममध्ये पाहून त्रास व्हायचा. हे ऑस्ट्रेलियन खेळाडू किती माजोरडे आहेत, असं आपण एकेकाळी बोलायचो. त्यामुळे मला IPL हा फॉर्मॅटच आवडला नाही.'
'मला मोठ्या स्क्रीनवरच क्रिकेट बघायला आवडतं. मोबाईलवर हॉटस्टार लावून पाहत बसणं ते मी करत नाही. त्यात काही मजाच नाही. तसंच आयपीएल हे जास्तकरुन पैशांसाठी आहे असंही मला वाटतं.' असंही आदिती म्हणाली.