Join us

"कजरा मोहब्बत वाला...", गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासार यांचा जबरदस्त डान्स; एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:27 IST

ऐश्वर्या नारकर यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटो नेटकऱ्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. दरम्यान

Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासह ऐश्वर्या नारकरसोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटोंमुळे त्या चर्चेत येतात. नुकताच त्यांनी 'कजरा मोहब्बतवाला' गाण्यावर डान्स करून याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत अविनाश नारकर नसून अभिनेत्री अश्विनी कासार दिसते आहे. जवळपास ५६ वर्षांपूर्वीच्या गाण्यासाठी त्यांनी ब्लक अॅंड व्हाइटमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. 

ऐश्वर्या नारकर यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटो नेटकऱ्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. दरम्यान, नुकताच  १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किस्मत' चित्रपटातील कजरा मोहब्बत वाला या गाण्यावर नृत्य सादर करताना व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अश्विनी कासारनेही त्यांना साथ दिली आहे. या व्हिडीओमध्ये दोघींचीही अदाकारी, हावभाव पाहून नेटकरी त्यांची स्तुती करत आहेत. शिवाय चाहत्यांनी व्हिडीओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला 'Music over chatter...' असं कॅप्शन देत सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर यांच्या या व्हिडीओवर अविनाश नारकर यांनी "व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा....क्या बात है...!! खूप खूप खूप गोड....!!" कमेंट केल्याची पाहायला मिळतेय. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया