Join us

'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 12:54 IST

अविनाश नारकर-ऐश्वर्या नारकर यांनी पाडव्यानिमित्त केलेला नवीन रील व्हिडीओ चर्चेत आलाय (avinash narkar, aishwarya narkar)

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांची लाडकी जोडी. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी टीव्ही, नाटक आणि सिनेविश्वात कार्यरत आहेत. अविनाश-ऐश्वर्या यांच्या भूमिकांची चर्चा होतेच. शिवाय सोशल मीडियावर हे दोघे नवरा बायको जे रील व्हिडीओ करतात त्याचीही चांगलीच हवा असते. अनेकदा दोघांना ट्रोलही केलं जातं तरीही अविनाश-ऐश्वर्या सोशल मीडियावर बिनधास्तपणे रील करत असतात. आज दिवाळी पाडव्यानिमित्त दोघांनी केलेला रील व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

अविनाश-ऐश्वर्या यांचा रील व्हिडीओ चर्चेत

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर एक रील शेअर केलाय. या रीलच्या खाली ऐश्वर्या यांनी कॅप्शन दिलंय की, पाडव्या निमित्त नवऱ्याने केली अशी स्तुती...!!😝😂😂(फिल्मी न्यूज..) पुढे या रीलमध्ये शांताबाई हे गाणं वाजताना दिसतं. रुपाची खाण, दिसते छान, नाकात नथीचा मान हे गाण्यातले बोल अविनाश पत्नीसाठी बोलताना दिसतात. या दोघांचा पाडव्यानिमित्त हा धमाल रील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

अविनाश-ऐश्वर्या यांचं वर्कफ्रंट

ऐश्वर्या या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अभिनय करत आहेत. या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचकाच्या भूमिकेत होत्या. पण विरोचकाचा अंत झाल्यानंतर  या मालिकेत त्या मैथिली (शतग्रीव) हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहेत. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अविनाश नारकर सध्या विविध मराठी  सिनेमांमध्ये आणि युट्यूब व्हिडीओमध्ये काम करताना दिसत आहेत. 

टॅग्स :दिवाळी 2024ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरदिवाळीतील पूजा विधी