Join us

बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अक्षयाची चपराक; म्हणाली, 'अशा लोकांकडे...'

By शर्वरी जोशी | Updated: August 2, 2023 16:12 IST

Akshaya naik: 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंग करणाऱ्या लोकांच्या तोंडात सणसणीत चपराक दिली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). 'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला आली. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील लतिका आणि खऱ्या आयुष्यातील अक्षया यांच्यात बरचं साम्य आहे. त्यामुळे लतिकाप्रमाणेच अक्षयाही न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे बोलते. अलिकडेच अक्षयाने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंग करणाऱ्या लोकांच्या तोंडात सणसणीत चपराक दिली आहे. "लोकांकडे खूप फुकट वेळ आहे. त्यामुळेच एखादा जाड असेल तर त्याला त्यावरुन बोलणार. कोणी बारीक असेल तर त्याला त्याच्यावरुन बोलणार. म्हणजे लोक कोणत्याही गोष्टीवरुन एखाद्याला जज करतात. लोकांना बोलायला काही कारण लागत नाही. त्यामुळे आपण स्वत:ला किती त्रास करुन घ्यायचा. किंवा त्यांच्या बोलण्यातून आपण काय बोध घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं. आणि, लोक काय बोलतात याचा विचार करण्यात आपला वेळ घालवायचा नाही. उलटपक्षी आपल्या कृतीतून आपण काय आहोत हे दाखवून द्यायचं," असं अक्षया म्हणाली.

Exclusive: सेलिब्रिटी ते डिलिव्हरी वूमन! अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे

'लोक थेट येऊन कंबरेत हात टाकतात'; मराठी अभिनेत्रीला आला चाहत्यांचा विचित्र अनुभव

दरम्यान, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अक्षयाने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे या मालिकेमुळे लोकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. इतरांना त्यांच्या दिसण्यावरुन  जज करण्याच्या लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे.

टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीटेलिव्हिजन