Amruta Deshmukh Post: अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh)आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. अगदी गेल्यावर्षीच त्यांनी लग्नगाठ बांधली आणि नव्या आयुष्याला सुरूवात केली. सोशल मीडियावर या जोडप्याची कायमच चर्चा होताना दिसते. दरम्यान, आज प्रसाद अभिनेता प्रसाद जवादेचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याची बायको म्हणजेच अमृता देशमुखनेसोशल मीडियावर खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्याचे काही फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये प्रसादच्या बर्थडेची तिने जोरदार तयारी केली आहे, असं दिसतंय. सोबतच त्यांनी रोमॅंटिक अंदाजातही काही फोटो क्लिक केले आहेत. अमृता देशमुखने सोशल मीडियावर हीपोस्ट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "रहना तू है जैसा तू, धीमा धीमा झोंका या फिर जुनून, Happy Birthday Jigglypuff " तिच्या या हटके कॅप्शनने चाहत्यांचही लक्ष वेधलं आहे. शिवाय अमृताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. त्यानंतर प्रसाद-अमृताने लग्न केलं.