Join us

'खूप वर्षांपूर्वी तुम्ही प्रॉमिस केलं होतं'; सासरी गेलेल्या अमृताची वडिलांसाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 6:04 PM

Amruta pawar: अमृताने लग्नसोहळा पार पडल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांप्रतीचं प्रेम, आदर, आपुलकी व्यक्त केली आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार (amruta pawar). काही दिवसांपूर्वीच अमृताने बायोमेडिकल इंजिनिअर असलेल्या नील पाटीलसोबत लग्न केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अमृताच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्येच तिने तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अमृताने लग्नसोहळा पार पडल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांप्रतीचं प्रेम, आदर, आपुलकी व्यक्त केली आहे.

"मी आज खरं बोलणार आहे, लग्नासाठी मुलगा बघताना तुम्ही मला खरंतर गोंधळात टाकलं होतं. तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या. पण आता लग्न झाल्यावर मला त्या गोष्टीसाठी तुमचे आभार मानायचे आहेत. आजपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला साथ दिली, आत्मविश्वास दिला. तुम्ही आणि आईने मला खूप वर्षांपूर्वी प्रॉमिस केलं होतं की तुम्ही मला कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही अडवणार नाही. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकले. मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे आई वडील भेटले", असं अमृता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळी मी चुकले त्यावेळी तुम्ही मला माझी चूक दाखवून दिलीत, योग्य मार्ग दाखवला. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली.  जगाला काय वाटतं याचा विचार सोडून मला जे काही वाटत ते करण्याची हिंमत दिलीत. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी थँक यू बाबा. मी तुमच्यावर किती प्रेम करते हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही."

दरम्यान, अमृताची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तसंच तिचं अभिनंदनही केलं आहे. अमृताने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं व्यतिरिक्त काही पौराणिक मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार