Join us

Anvita Phaltankar: चिंब पावसानं रानं झालं...! लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये स्वीटूने केलं पावसात फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:00 IST

Anvita Phaltankar : सोशल मीडियावर (social media) सक्रीय असलेली स्वीटू अर्थात अन्विता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

ठळक मुद्देअन्विताने इन्स्टाग्रामवर (instagram) तिचे दोन फोटो शेअर केले आहेत.

कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे मालिकेसोबतच

प्रेक्षकांमध्ये ही कलाकार मंडळीही लोकप्रिय झाली आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे स्वीटू. अभिनेत्री अन्विता फलटणकरने (anvita phaltankar) स्वीटू ही भूमिका साकारली आहे.सोशल मीडियावर (social media) सक्रीय असलेली स्वीटू अर्थात अन्विता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे काही फोटो (photos), व्हिडीओ (video) चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्येच तिने नुकतेच शेअर केलेले फोटो चाहत्यांची मन जिंकून घेत आहेत. 

मालिकेच्या सेटवर अभिनेत्याने केला अक्षयाचा पाठलाग; सोशल मीडियावर शेअर केला Video

अन्विताने इन्स्टाग्रामवर (instagram) तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये त्याच ड्रेसमध्ये तिने ब्लॅक अॅण्ड व्हाइट कलरचा फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोमध्ये तिच्या हातात छत्री असून तिने खास पावसात हे फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अन्विताने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.  'टाइमपास', 'गर्ल्स' या चित्रपटात ती झळकली आहे. तसंच 'चतुर चौकडी' आणि 'रुंजी' या मालिकांमध्येही तिला पाहायला मिळालं होतं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसिनेमासेलिब्रिटी