Join us

अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:01 IST

Madhurani gokhale: मधुराणीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या बेस्टफ्रेंडची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या गाजलेल्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale). या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन मधुराणीने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने फ्रेंडशीप डे चं निमित्तं साधत तिच्या बेस्टफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे.

फ्रेंडशीप डे निमित्त सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या बेस्टफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या मधुराणीही मागे नाही. मधुराणीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या बेस्टफ्रेंडची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे.

मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची लाडकी लेक दिसत असून आपली लेकच आपली बेस्टफ्रेंड असल्याचं तिने म्हटलं आहे. यापूर्वीही मधुराणीने तिच्या लेकीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र, फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोमधून या मायलेकीचं नातं किती स्ट्राँग आहे हे दिसून येतं.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरफ्रेंडशिप डेसेलिब्रिटी