Join us

'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 14:24 IST

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आतार घेत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे मधुराणी पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे मधुराणीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आतार घेत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

खासकरुन इन्स्टाग्रामवर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिचे सेटवरील किंवा वैयक्तिक जीवनातील फोटो शेअर करत असते. यात अनेकदा ती साडीतील सुंदर फोटो शेअर करत असते. अलिकडेच मधुराणीने असाच एक साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याला साजेसं कॅप्शन दिलं. तिचं हे कॅप्शन सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. .बिती रात आए थे तुम ख्वाब में मेरे , इतनी फुरसत तुम्हे मिली कैसे...!!!'. असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.  या फोटोमध्ये मधुराणीने लाईट पिंक रंगाची साडी नेसली आहे. तसंच ती झेंडूच्या फुलांच्या माळांमध्ये उभी असल्याचं दिसून येत आहे. सध्या तिच्या या फोटोला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरसेलिब्रिटी