Join us

बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली अन्...; टीव्हीवरील मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:21 IST

'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री दिशा परदेशी हा मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान' या मालिकेतून दिशा घराघरात पोहोचली. सध्या ती 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिशा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत ती पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. अनेकदा ती तिच्या हॉट फोटोंनी चाहत्यांना घायाळही करते. सध्या दिशाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्विमिंगपूलमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिशा बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला तिने 'जलपरीच्या गोष्टी' असं कॅप्शन दिलं आहे. दिशाचा हा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

मालिकांबरोबरच दिशाने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केलं आहे. ती लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती पुष्कर क्षोत्री, पूजा सावंतबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता