Join us

'लवकरच तुम्हाला गोष्टी कळतील..';दिव्या पुगांवकर खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 20:00 IST

Divya Pugaonkar: दिव्यासह अभिनेता अभिषेक रहाळकर यानेही त्याच्या लग्नाचा प्लॅन यावेळी सांगितला आहे.

'मुलगी झाली हो' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar).सध्या 'दिव्य मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत काम करतांना दिसत आहे. या मालिकेत तिने आनंदी ही भूमिका साकारली आहे. सध्या मालिकेमध्ये आनंदी आणि सार्थक यांच्या लग्नाची लगबग सुरु असून तिने खऱ्या आयुष्यातील तिचा लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.

'मन धागा धागा' या मालिकेत सध्या आनंदी आणि सार्थक यांचा लग्नसोहळा पार पडत आहे. यामध्येच सेटवरुन दिव्याने 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला.

"माझ्या घरी लग्नाचं प्लॅनिंग सुरु आहे. लवकरच गोष्टी कळतील तुम्हाला. पण, जेव्हा करणार असेन तेव्हा मी सांगेनच तुम्हाला", असं म्हणत दिव्याने तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला.

दरम्यान, दिव्याने या तिच्या लग्नाचे संकेत तरी या मुलाखतीच्या माध्यमातून दिले आहे. तिच्यासोबतच सार्थकने म्हणजेच अभिनेता अभिषेक रहाळकर यानेही त्याच्या लग्नाचे प्लॅन सांगितले आहेत. कदाचित पुढच्या वर्षी तो बोहल्यावर चढू शकतो असं त्याने यावेळी सांगितलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार