Join us

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 3:59 PM

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. त्यांची आठवण म्हणून आता तिने हातावर टॅटू काढला आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. दरम्यान आता अश्विनीने त्यांची आठवण म्हणून सुंदर टॅटू हातावर काढला आहे. तिने या टॅटूचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या टॅटूला खूप पसंती मिळते आहे.

अश्विनी महांगडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टॅटूचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, आपल्या सोबत कोणी, कधी आणि किती रहावं हे आपण ठरवावे. मला माझ्या सोबत नाना हवे आहेत. तसे ते कायम आहेतच म्हणा. अश्विनीने हा टॅटू वाईमध्ये काढला आहे. तिच्या या टॅटूला खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

अश्विनी महांगडे सध्या आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते आहे. अरुंधतीला नोकरी मिळावी या प्रयत्नात ती अरुंधतीच्या घरी जाऊन तिची भेट घेत आहे. एका सामाजिक संस्थेमध्ये अरुंधतीला काम मिळवून देऊन तिचा प्रवास सुखकर कसा होईल या प्रयत्नात सध्या ती दिसत आहे.

या मालिकेसोबतच अश्विनी हिंदी मालिकेतही झळकणार आहेत. सोनी वाहिनीवरील ‘मेरे साईं’ या हिंदी मालिकेतून अश्विनी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत अश्विनी महांगडेने सामाजिक कार्य करताना दिसते. कोरोना काळात महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय प्रतिष्ठानमार्फत तिने केली होती. त्यावरून तिचे खूप कौतुक देखील झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी त्यांची पहिली रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल झाली आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका