बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागणं यामुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलही होते. मागच्या काही दिवसांपूर्वी हेमांगी कवीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे ती ट्रेंडही झाली होती. तूर्तास हेमांगीच्या ताज्या पोस्टची चर्चा आहे. ‘आज म्हनलं जरा टशनवालाच फोटू पोस्टू... आनी याला कारन हाये ह्यो काळा रंग...,’अशा आशयाची पोस्ट हेमांगीने फेसबुकवर शेअर केली आहे. सोबत अर्थातच टशनवाला फोटूही आहेच.
हेमांगी लिहिते...
आज म्हनलं जरा टशन वालाच फोटू पोस्टू!
आनी याला कारन हाये ह्यो काळा रंग!
लहानपणापासून मला काळ्या रंगाचं भयंकर आकर्षण आहे. शाळेत ही मी काळ्या शाईचा Pen वापरायचे. बोर्डाच्या परीक्षेला नियम म्हणून निळ्या शाईचा pen वापरला. घरात ही काळ्या रंगाचे कपडे, bags अगदी काहीही वापरायला कधीच कुणी मनाई केली नाही. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपण सावळे आहोत म्हणून आपण light किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांपेक्षा काळ्या कपड्यांमध्ये जरा गोरे, उजळ दिसतो असा समज होता माझा. यात कितपत तथ्य आहे मला माहित नाही पण लहानपणी आपण थोडं तरी गोरं दिसावं याचा अट्टहास होता. आता तो बिलकुल नाही. अपन जैसे है वैसे सॉलिडच है!
पांढरा shirt Blue denims मधला पुरुष तर हृदय घायाळ करतोच पण समजा blue denims वर black shirt घातलं तर म्हणजे ओह हो हो! कहरच! हो की नाई? काळ्या रंगामध्ये एक वेगळाच swag आहे. Solid वाटतं. स्वतःला ही आणि बघणाऱ्याला ही. एक वेगळाच attitude येतो. Confident वाटतं. निदान मला तरी वाटतं. आणि तुम्हांला?, अशी पोस्ट हेमांगी कवीने शेअर केली आहे.
हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे. मी मरायला टेकलो होतो... पण तुझा फोटो बघितला अन् मी अमर झालो, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.