Join us

हातात काठी अन् डोळ्यांवर चष्मा! 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकर दिसणार 'या' मराठी मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:45 IST

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर नवीन वर्षात नव्या मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे (jahnavi killekar)

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जान्हवीला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. जान्हवीने बिग बॉस मराठीचं नवीन पर्व चांगलंच गाजवलं. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये जान्हवी ९ लाखांची बॅग घेऊन फिनालेमध्ये घराबाहेर पडली होती. अशातच जान्हवीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. जान्हवी लवकरच एका मराठी मालिकेत अभिनय करणार आहे.

जान्हवी किल्लेकर झळकणार या मालिकेत

जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर तिच्या नवीन मालिकेविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. जान्हवी स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेत झळकणार आहे. जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिलीय. इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील असं जान्हवीच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिचा खास लूक चाहत्यांसमोर रिव्हिल करण्यात आलाय. हातात काठी अन् डोळ्यांवर चष्मा असलेला जान्हवीचा स्वॅगवाला लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. 

नवीन वर्षात नवीन भूमिका

अशाप्रकारे २०२५ मध्ये अर्थात नवीन वर्षात जान्हवीला नवीन मालिकेची लॉटरी लागली आहे. या मालिकेनिमित्ताने बिग बॉस मराठीनंतर जान्हवी अनेक वर्षांनी मराठी मालिकाविश्वात अभिनय करताना दिसणार आहे. जान्हवीला आपण याआधी 'भाग्य दिले तू मला', 'आई माझी काळूबाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. जान्हवीला 'बिग बॉस मराठी ५' नंतर स्टार प्रवाहवरील मालिकेत पाहायला तिचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजन