Join us

जुई गडकरीने 'सकल बन' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ पाहून 'हिरामंडी'च्या अभिनेत्रींना विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:57 PM

जुईला आता 'हिरामंडी' या वेब सीरिजमधील गाण्याची भुरळ पडली आहे. 'हिरामंडी'मधील 'सकल बन' या गाण्यावर जुईने व्हिडिओ बनवला आहे.

मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. 

जुईला आता 'हिरामंडी' या वेब सीरिजमधील गाण्याची भुरळ पडली आहे. हिरामंडीमधील 'सकल बन' या गाण्यावर जुईने व्हिडिओ बनवला आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जुईने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. झुमके आणि साधा मेकअप करून तिने रॉयल लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. सकल बन या गाण्यावरील जुईने केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी जुईचं कौतुक केलं आहे. 

"खूप सुंदर दिसत आहात...उगाच थोडी तुम्हाला स्टार प्रवाहवरची क्वीन म्हणतात", "महाराष्ट्राची क्रश", "जुई ताई तू खूप छान दिसतेस", "मस्त लूक...छान एक्सप्रेशन, रॉयल लूक", "गोड गोड राणी" अशा कमेंट्स चाहत्यांनी जुईच्या या व्हिडिओवर केल्या आहेत. 

'पुढचं पाऊल' मालिकेत सोज्वळ आणि साध्या सुनेची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 'पुढचं पाऊल'नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'वर्तुळ', 'सरस्वती' या मालिकांमध्ये ती झळकली. 'बिग बॉस मराठी'मध्येही जुई सहभागी झाली होती. आता सध्या ती स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार