Join us

'या' आजाराचा सामना करतेय अभिनेत्री जुई गडकरी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:47 IST

सध्या जुई एका आजाराचा सामना करत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). उत्तम अभिनय आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. 'पुढं पाऊल', 'तुजवीण सख्या रे', 'बिग बॉस मराठी','सरस्वती' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकत तिने लोकप्रियता मिळवली आहे. सध्या जुई एका आजाराचा सामना करत आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

नुकतेच  जुईने इन्स्टाग्रामवर 'क्वीक चॅट, लेट्स डू इट' असं सेशन ठेवलं होतं. यावेळी तिनं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी जुईनं चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला 'दीदी तू आजारी आहेस का, ठरलं तर मगमध्ये आवाज वेगळा येतो आहे'. त्यावर जुईने उत्तर दिले की, 'हो, घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल'.

तर यासोबतच आणखी एका चाहत्यानं तिला विचारलं, 'तुमची तब्येत बरी झाली का?' त्यावर जुई उत्तर देत म्हणाली, 'अजून तब्येतीत सुधारणा होते आहे, मध्येच मी म्युट मोडमध्ये जाते आहे'.

सध्या जुई ही 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती सायली ही भूमिका वठवत आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.  

टॅग्स :जुई गडकरी