Join us

Video: जुलै महिन्यातच गुपचूप पार पडलं होतं खुशबू तावडेचं डोहाळे जेवण, आता व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:17 IST

अभिनेत्री खुशबू तावडे लवकरच आई होणार आहे.

Khushboo Tawde Baby Shower : 'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi) मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री खुशबू तावडे (khushboo Tawde) लवकरच आई होणार आहे. काही दिवसांआधीच व्हिडीओ शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती तिनं चाहत्यांना दिली होती. आता तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ समोर आला आहे. जे गेल्या जुलै महिन्यातचं गुपचूप पार पडला होता. 

खुशबूचं डोहाळे जेवण हे २१ जुलै रोजी पार पडलं. जेव्हा डोहाळे जेवण झालं, तेव्हा तिची प्रेग्नंसी बातमी चाहत्यांसोबत शेअर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी कुठलाही गाजवाजा न करत अगदी साध्या पद्धतीने घरीच डोहाळे जेवण पार पाडलं. याचा व्हिडीओ खुशबूची बहीण अभिनेत्री तितीक्षा तावडेने युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  तितीक्षा आणि तिचा पती सिद्धार्थ बोडके कुटुंबाबरोबर खुशबूच्या डोहाळे जेवणाची जोमाने तयारी करताना दिसून येत आहेत. 

खुशबूच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पती संग्राम साळवी उपस्थित नव्हता. कारण त्याच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील शुटिंगचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मुलगा की मुलगी ओळखण्याच्या खेळात खुशबू आणि संग्रामने पेढ्याची वाटी उघडली. यावरून खुशबू पुन्हा एकदा गोंडस मुलाला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

 खुशबू आणि संग्रामला राघव हा पहिला मुलगाही आहे. खुशबू आणि संग्राम 2018 साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांना राघव हा मुलगा झाला. तर आता दुसऱ्या बाळासाठी ते आतुर आहेत. खुशबूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिची झी मराठीवर 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका सुरु होती. त्यातून खुशबूने एक्झिट घेतली आहे. प्रेग्नेंसीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. तिने साकारलेली उमा खोत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.  आता उमाच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य दिसणार आहे. 

टॅग्स :तितिक्षा तावडेसेलिब्रिटीटेलिव्हिजनप्रेग्नंसी