Join us

मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 6:04 PM

Madhurani gokhale prabhulkar: अलिकडेच मधुराणीने सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर(madhurani gokhale-prabhulkar). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून तिने बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. मात्र, या मालिकेने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची वरचेवर चर्चा होताना दिसून येते. मधुराणीसुद्धा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते. यात बऱ्याचदा ती सेटवरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

अलिकडेच मधुराणीने सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मालिकेत कायम साध्या रुपात वावरणाऱ्या अरुंधतीला असं मेकअप करताना पाहून चाहते खुश झाले आहेत. इतकंच नाही तर तिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, मधुराणी या व्हिडीओमध्ये मेकअप रुममध्ये असल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिचा मेकओव्हर कशा पद्धतीने होतोय हे तिने या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे. मधुराणी उत्तम अभिनेत्री असून तिने मालिकांसह नाटक, सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटीटेलिव्हिजन