‘इश्कबाझ’मध्ये नकुल मेहताच्या नायिकेच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री मंजिरी पुपाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 04:23 PM2018-12-18T16:23:35+5:302018-12-18T16:23:48+5:30
या कालबदलानंतर टीव्हीवरील सर्वांचा आवडता कलाकार नकुल मेहता हा बॉलीवूडचा स्टार शिवांशसिंह ओबेरॉयच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री मंजिरी पुपाला असेल.
‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ या लोकप्रिय मालिकेच्या कथानकाचा काळ एका पिढीने पुढे नेण्यात येणार असून त्यानंतरच्या कथानकातील गूढरम्य भागाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यात येणार आहे. या कालबदलानंतर टीव्हीवरील सर्वांचा आवडता कलाकार नकुल मेहता हा बॉलीवूडचा स्टार शिवांशसिंह ओबेरॉयच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री मंजिरी पुपाला असेल.
आपला आनंद व्यक्त करताना मंजिरी पुपाला म्हणाली, “मला ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत नकुल मेहताच्या नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्यामुळे मी अतिशय आनंदित झाले आहे. या भूमिकेद्वारे मी प्रथमच हिंदी मालिकेत भूमिका साकारीत असून आदितीच्या भूमिकेत मी पदार्पण करणार आहे. मी महिला पोलिस निरीक्षकच्या भूमिकेत असून आपल्या सर्वांनाच असणारी चांगल्या-वाईटाची जण मलाही असते आणि त्यामुळेच माझी भूमिका प्रेक्षकांना लगेचच आपलीशी वाटेल. आदिती आणि मी यांची भेट होणं हे माझ्या नशिबातच होतं आणि आता तिच्या भूमिकेच्या प्रवासाला मी प्रारंभ करीन.”
काही मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेद्वारे ही मराठी अभिनेत्री हिंदी मालिकांच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुपरस्टार शिवांश आणि कठोर पोलिस अधिकारी आदिती या दोन भिन्न क्षेत्रांतील व्यक्तिरेखांतील संघर्षामुळे या मालिकेत नवा अध्याय सुरू होईल.