Join us

Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:01 IST

Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस 4 वर्षांनंतर भारतात परतली आहे. मृणालने लग्नाचा निर्णय आणि आईपण यावर भाष्य केलं आहे.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) 4 वर्षांनंतर भारतात परतली आहे. पती आणि लेकीसोबत ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र आता मृणाल भारतातच राहणार असून पुन्हा कामही सुरू करणार आहे. याच दरम्यान मृणालने लग्नाचा निर्णय आणि आईपण यावर भाष्य केलं आहे. तू लग्न केलंस तेव्हा तू करियरच्या एका पिकवर होतीस अशावेळी लग्नाचा निर्णय घेताना काय विचार केलास असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने उत्तर दिलं आहे.  

"मी आजपर्यंत काहीच ठरवून केलं नाही असं मला वाटतं. Go With The Flow हा माझा नियम आहे. पर्सनली मलाही असं वाटलं होतं की, मला लग्न करायचं होतं, आता आईही झाली आहे... मला आईही व्हायचं होतं. मला त्यात काही वावगं वाटलं नाही. हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, हे तुमचं आयुष्य नक्कीच नाही. माझं वय 28 होतं. लग्न करायचं असं मी ठरवलं नव्हतं. तो निर्णय मी आई-वडिलांवर सोडला होता." 

"नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की, आता वेळ नको वाया घालवायला. हीच ती वेळ आहे आणि मग मी तो निर्णय घेतला. पण त्यानंतर माझं करियर थांबलंच नाही. असं सासर, हे मन बावरे य़ा मालिका केल्या" असं मृणाल दुसानिसने म्हटलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हे सांगितलं आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना','तू तिथे मी' या मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. 

2018 साली आलेली 'हे मन बावरे' ही तिची शेवटची मालिका होती. त्यानंतर ती लग्न करुन अमेरिकेला स्थायिक झाली. तिला नुर्वी नावाची मुलगी आहे. आता मृणाल पती आणि लेकीसह तब्बल चार वर्षांनी भारतात आली आहे. नाशिकमधील गोदाकाठ येथे सेल्फी शेअर करत तिने काही दिवसांपूर्वी ही गुडन्यूज दिली होती. मृणाल दुसानिसने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.  

टॅग्स :मृणाल दुसानीसलग्न