प्राजक्ता माळी मालिकेच्या शूटिंगमधून वेळात वेळ काढत भटकंती करताना दिसत असते. प्राजक्ताला सध्या सोशल मीडियावर ज्योतिर्लिंगांचे फोटो शेअर करत असते. अशातच प्राजक्ता नुकतीच मध्य प्रदेश येथील महेश्वर घाट, खरगोन येथे असलेल्या मंदिरात दर्शनाला गेली होती. त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अफाट कार्याने प्राजक्ता भारावली. तिने सोशल मीडियावर तिला आलेला खास अनुभव शेअर केला.
प्राजक्ता माळीने सांगितला अनुभव
प्राजक्ताने मंदिराचे खास फोटो शेअर करुन लिहिलंय की, "महेश्वर घाट- खरगोन , मध्य प्रदेश. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी (माता) होळकर” यांचं अफाट कार्य विशेषतः धर्मकार्याविषयी मला माहिती होती. आज ते सर्व कार्य जवळून पाहिलं आणि त्यांच्याविषयीचा आदर लाखो पटींनी दुणावला. १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करताना, त्याचं महादेव प्रेम आणि कार्य पाहणं फार मोलाचं ठरतय. (होय…लवकरच अंगावर माहेश्वरी साड्या बघायला मिळतील)"
अशाप्रकारे प्राजक्ताने अहिल्याबाई होळकर यांच्याप्रती आदर व्यक्त केलाय. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ता माळी पुन्हा एकदा त्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो गाजवत आहे. याशिवाय प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमातील प्राजक्ताच्या अभिनयाचं आणि नृत्याचं चांगलंच कौतुक झालं.