Join us  

नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; अभिनेत्री सुरेखा कुडची नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:06 PM

सुरेखा कुडची नव्या भूमिकेत दिसणार, अभिनेत्रीने शेअर केले फोटो.

Surekha Kudachi Viral Post : अभिनेत्री सुरेखा कुडची यांचं नाव मराठी मनोरंजन विश्वात मोठ्या अदबीनं घेतलं जातं. गेली अनेक वर्षे त्या कलाविश्वात सक्रिय आहेत. सुरेखा यांनी आजवर विविध मालिका आणि सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. अलिकडेच त्या स्टार प्रवाहवरील 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत काम करताना दिसल्या. पण, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री सुरेखा कुडची एका नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

सुरेखा कुडची यांची सोशल मीडियावरतगडी फॅन फॉलोइंग आहे. नुकतेच त्यांनी स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. विशेष एका चित्रपटाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या समोर येणार आहेत. या नव्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा लावणी किंग आशिष पाटील देखील दिसेल असं कळतंय. शिवाय आपल्या सहकलाकारांसोबत एक ग्रुप फोटो क्लिक करत सुरेखा कुडची यांनी ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

गुलाबी रंगाची नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज असा लूक त्यांनी केला आहे. सोबत आशिष कुलकर्णीही दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना सुरेखा यांनी कॅप्शनमध्ये लिहलंय, "एका नवीन चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान पुन्हा एकदा आशिषसोबत  काम करण्याचा योग आला. धन्यवाद! आशिष तुझ्यासोबत काम करणं एक पर्वणी असते". त्याच्या या फोटोंमुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 

सुरेखा कुडची 'बिग बॉस मराठी- ३' मध्येही सहभागी होत्या. 'फॉरेनची पाटलीण', 'पहिली शेर - दुसरी सव्वाशेर - नवरा पावशेर' अशा सिनेमांमध्ये सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.

टॅग्स :टिव्ही कलाकारसिनेमासोशल मीडिया