संतापजनक, मुंबईतल्या सोसायट्यांची मनमानी, भाड्याने घर मिळत नसल्याने सेटवरच राहण्याची आली 'या' अभिनेत्रीवर वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 07:55 PM2020-08-20T19:55:08+5:302020-08-20T19:55:24+5:30
ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही.
चित्रपटात मालिकेत काम करणा-या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. त्यातच एखादा चित्रपट सुपरहिट झाला, त्या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला की त्या चित्रपटातील कलाकाराचं आयुष्यच पालटतं हेही आपण वारंवार पाहिलंय. मात्र एक अभिनेत्री अशी आहे की अनेक मालिकेत झळकूनही तिचं जीवन काही बदललं नाही. या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा बिरारी.ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मध्येही ती झळकत आहे. मात्र तिला गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
कोरोना काळात तिच्यावर आलेल्या संकटा बद्दल बोलताना पूजा म्हणाली, आपली मनोरंजनसृष्टीसुद्धा हळूहळू का होईना सुरु झाली. पण काही प्रॉब्लेम्स हे मालिकांच्या बिहाइंड सीन सारखे आहेत आणि सध्या कलाकार म्हणून माझ्या बाबतीत ते घडत आहेत आणि म्हणूनच मला ते माझ्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत.
झी युवा या वाहिनीने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत मला पुनः संधी दिली. या लॉकडाऊनमध्ये एक चांगले काम मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे आहे जे मला मिळालं मात्र ते जर तसच ठेवायच असेल तर मला मुंबईमध्ये राहयाला भाड्याने घर हवंय मात्र ते काही सध्या मिळताना दिसत नाहीय. मला आता खरंच घर शोधण्याचा आणि सतत नकार मिळण्याचा त्रास आणि कंटाळा आलाय. झी युवा वाहिनीने सेट वर जागा अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी इतर लोक शूटिंग सुरु झाल्यापासून राहत असल्यामुळे रूम्स नाहीत.
सध्या मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही. मी आणि माझ्या सारखे अनेक कलाकार बाहेरच्या शहरातून मुंबईमध्ये कामा-निमित्त येतात. या लॉकडाऊनमध्ये न्यू-नॉर्मलचे पालन करत स्वतःची आणि इतरांची काळजी घेत आम्हाला काम करायचे आहे. पण काही निवडक सोसायटी सेक्रेटरी आम्हाला लॉकडाऊनच्या नावावर जागा द्यायला नकार देत आहेत. सध्या सगळं हळूहळू सुरु झालंय पण अजूनही न्यू नॉर्मलचे रूल्स मानले जात नाहीत. स्वतःची काळजी घेऊन जर काम नाहीं सुरु करू शकलो तर कसं होणार? मला अजूनही घर मिळत नाही आहे. कलाकरांना होणा या त्रासाबद्दल कोणी काही मार्गदर्शन करू शकेल का?"