Join us

भरपावसात प्राजक्ताने घेतलं देवी काळुबाईचं दर्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:52 IST

Prajakta gaikwad: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता भरपावसामध्ये भिजत असून धुक्यामध्ये ती डोंगर चढत आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). उत्तम अभिनय आणि साधेपणा यामुळे प्राजक्ता आज चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. प्राजक्ता बऱ्याचदा अभिनयातून वेळ काढत शक्य होईल तेव्हा देवदर्शन घेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने काळुबाई देवीचं दर्शन घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता साऊथमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टचं काम करत होती. हे काम संपवून नुकतीच ती महाराष्ट्रात परत आली आहे. विशेष म्हणजे पुन्हा परतल्यानंतर तिने देवी काळुबाईचं दर्शन घेतलं. येथील काही व्हिडीओ आणि फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'आई काळुबाईच्या नावानं चांगभलं', असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता भरपावसामध्ये भिजत असून धुक्यामध्ये ती डोंगर चढत आहे. यावेळी तिच्या हातामध्ये पुजेचं ताट असल्याचं दिसून येत आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच तिची देवावर असलेल्या श्रद्धेविषयीदेखील कौतुक केलं आहे.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजन