‘विनोदाची राणी’ प्राजक्ता हनमघर झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:14 AM2022-02-10T10:14:49+5:302022-02-10T10:16:11+5:30

Prajakta Hanamghar : प्राजक्ताने ही गोड बातमी शेअर करताच सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

marathi actress prajakta hanamghar becomes mother, gives birth to a baby girl | ‘विनोदाची राणी’ प्राजक्ता हनमघर झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

‘विनोदाची राणी’ प्राजक्ता हनमघर झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

googlenewsNext

prajakta hanamghar becomes mother : मराठी मालिका आणि कॉमेडी शोमध्ये झळकणारी ‘विनोदाची राणी’ प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar) आई झालीये. होय, प्राजक्ताच्या  घरी चिमुकलीचे आगमन झालं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं  ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

‘आमच्या चिमुकलीचं आगमन झालंय. 23 जानेवारी 2022 रोजी तिचा जन्म झाला. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आभार,’ अशी पोस्ट तिने शेअर केली.  प्राजक्ताने ही गोड बातमी शेअर करताच  सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

चार वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला. रजत यांचा कलाविश्वाशी काहीच संबंध नाहीये. ते मुळचे धुळ्याचे असून आता पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉपोर्रेट कंपनीत कामाला आहेत.  

शेजारी शेजारी पक्के शेजारी, फू बाई फू आणि कॉमेडीची जीएसटी या कार्यक्रमांमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील सोनियाच्या भूमिकेमुळे ती चर्चेत आली. त्यानंतर वादळवाट,पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत काम करत असतानाच तिने लूज कंट्रोल, वेङिंग चा शिनेमा, धुरळा हे चित्रपट सुद्धा केले. अभिनयासोबतच प्राजक्ता ने काही कुकरी शोज पण हिट केले आहेत. 

प्राजक्ताचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेलं. दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजात असतानाच ती अभिनयाकडे वळली.  लवकरच प्राजक्ता महेश टिळेकर यांच्या ‘हवाहवाई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: marathi actress prajakta hanamghar becomes mother, gives birth to a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.