Join us

प्रार्थना पडली गुलाबी साडीच्या प्रेमात; शेअर केला ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:08 IST

Prarthana behere: प्रार्थनाच्या साध्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ', 'मितवा' यांसारख्या गाजलेल्या सिनेमा, मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली  लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे (prarthana behere). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रार्थनाने मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. प्रार्थना कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम ती नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे.

सध्या सोशल मीडियावर संजू राठोड याचं गुलाबी साडी हे गाणं तुफान ट्रेंड होतंय. आतापर्यंत या गाण्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी रील्स केले आहेत. त्यामुळे या गाण्यावर व्हिडीओ करायचा मोह प्रार्थनालाही आवरला नाही. प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

या व्हिडीओसाठी प्रार्थनाने सुरेख पर्पल रंगाची साडी नेसली असून त्यावर मोत्याचे दागिने परिधान केले आहेत. तसंच हलकासा मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. My Gulabi love असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीसिनेमा