Join us

गॅरीनंतर शनायाच्या तालावर नाचतोय आदित्य; पाहा रसिका सुनील अन् तिच्या नवऱ्याचा रॉकिंग डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 17:40 IST

Rasika sunil: सोशल मीडियावर सक्रीय असलेली रसिका अनेकदा तिच्या नवऱ्यासोबत आदित्य बिलागीसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. या मालिकेत शनाया ही नकारात्मक विनोदी भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सध्या रसिका कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा तगडा वावर आहे.  

सोशल मीडियावर सक्रीय असलेली रसिका अनेकदा तिच्या नवऱ्यासोबत आदित्य बिलागीसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने असाच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघंही फूल ऑन मस्तीच्या मूडमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

दरम्यान, रसिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. रसिका अभिनयासह अन्य अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे. रसिकाने नोव्हेंबर २०२१ मध्ये आदित्यसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांना धक्का दिला. या जोडीने गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :रसिका सुनिलटेलिव्हिजनटिव्ही कलाकार