Join us

'या' प्रसिद्ध निर्मातीमुळे झालं होतं ऋजुता देशमुखचं ब्रेकअप; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 11:19 AM

Rujuta Deshmukh: ऋजुताने पहिल्यांदाच तिच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील गोड आणि तितकीच गुणी अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख (rujuta deshmukh). 'कळत नकळत' या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळेच आजही तिची क्रेझ जराही कमी झालेली नाही. अलिकडेच '३६ गुणी जोडी' या मालिकेत झळकलेल्या ऋजुताचा सध्याच्या घडीला मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यात अलिकडेच तिने 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच तिच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं आहे.

ऋजुताने नुकतीच लोकमत फिल्मीच्या 'आपली यारी' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत प्रसिद्ध मराठी निर्माती अपर्णा केतकरदेखील होती. या दोघा मैत्रिणींनी या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी बोलत असताना माझा पहिला ब्रेकअप अपर्णामुळे झाला असं ऋजुताने सांगितलं. सोबतच तो ब्रेकअप होणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं हे देखील तिने आवर्जुन सांगितलं.

नेमका कसा झाला ऋजुताचा ब्रेकअप?

"लग्नापेक्षा माझ्या एका ब्रेकअपमध्ये ही माझ्या खूप जवळ होती. तो ब्रेकअप माझ्यासाठी खूप गरजेचा होता जे मला हिने जाणवून दिलं. हिने माझ्या आणखी काही मैत्रिणींना एकत्र आणून मला समजावलं. कारण, या सगळ्यामुळे तुझ्या आयुष्यात पुढे फार काही बरं होईल असं वाटत नाहीये. त्यामुळे ब्रेकअप करणं हाच पर्याय आहे हे त्यांनी मला सांगितलं", असं ऋजुता म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "पण या सगळ्यामुळे माझी खूप छान पुढे प्रगती झाली. मी या क्षेत्रात आले. नाही तर मी कुठेतरी भरकटले असते. पण, माझ्या एका ब्रेकअपमध्ये हिचा हात होता. जो माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला.

दरम्यान, ऋजुता मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. रंग माझा वेगळा, जाऊ नको दूर बाबा, 'राजा शिवछत्रपती', 'आभाळमाया', 'तू माझा सांगाती' , 'स्वप्नांच्या पालिकडले' ,'आनंदी हे जग सारे' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर,  'रायगडाला जेव्हा जग येते' या नाटकातही तिने काम केलं आहे. इतकंच नाही तर ऋजुता 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'एक गाडी बाकी अनाडी', 'नशीबवान' आणि हिंदी चित्रपट 'फॅमिली'मध्येही ती झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसिनेमासेलिब्रिटी