Join us

'गुलाबी साडी'वर समृद्धीने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, 'या गाण्याला न्याय दिलास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 16:25 IST

Samruddhi kelkar: गुलाबी साडीवर रील करण्याचा मोह समृद्धीलाही आवरला नाही आणि तिने भन्नाट व्हिडीओ शेअर केला.

छोट्या पडद्यावरील 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका बरीच गाजली होती. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर हिने किर्ती ही मुख्य भूमिका साकारली होती. समृद्धीची ही भूमिका बरीच गाजली. त्यामुळे आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते.

सध्या सोशल मीडियावर गुलाबी साडी हे गाणं प्रचंड ट्रेंड होत आहे. आतापर्यंत अनेकांनी या गाण्यावर रिल्स केले आहेत. या कलाकार मंडळी सुद्धा मागे नाहीत. यामध्येच आता समृद्धीलाही हा ट्रेंड फॉलो करण्याचा मोह आवरला नाही. तिने सुद्धा हा ट्रेंड फॉलो करत एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे.

समृद्धीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने गाण्यातील प्रत्येक ओळीला न्याय दिला आहे. प्रत्येक ओळीला सूट होईल असे फोटो आणि व्हिडीओ कोलाज करुन तिने हे रील तयार केलं आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. 

दरम्यान, अनेकांनी समृद्घीचा व्हिडीओ पाहून तिचं कौतुक केलं आहे. 'या गाण्याला तू न्याय दिला आहेस', 'आतापर्यंत कोणीच इतका सुरेख व्हिडीओ केला नव्हता', 'कमाल दिसते', 'व्हिडीओ पाहून पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर सेलिब्रिटींनीही त्याच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार